शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

जिजाऊ जन्मोत्वासाठी सिंदखेड राजा नगरी झाली सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 2:02 PM

यंदाचा हा ४२२ वा जन्मोत्सव सोहळा आहे. आयोजन समितीच्यावतीने सोहळ््याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यासह परदेशातून भाविक मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे येत असतात. सकाळी नऊ वाजता जिजाऊसृष्टीवर ध्वजवंदन होईल. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय मार्गदर्शन होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सवासाठी सिंदखेड राजा नगरी सज्ज झाली असून जिजाऊ सृष्टीवर त्यानुषंगाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजीच युवराज छञपती संभाजी राजे भोसले यांना मराठा विश्वभुषण पुरस्कार तर बबीता ताडे यांना जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी पाहता येथे वाहनतळ, दुकाने, उपहारगृह, प्रकाश व्यवस्था आणि जिजाऊ सृष्टीवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव स्थळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सुर्याेदयी जिजाऊ पुजन करून जिजाऊ सृष्टीवर पोहोचतील. या सोहळ््यासाठी राज्यासह परदेशातून भाविक मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे येत असतात. यंदाचा हा ४२२ वा जन्मोत्सव सोहळा आहे. आयोजन समितीच्यावतीने सोहळ््याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथे ४०० पेक्षा अधिक बुक स्टॉलही उभारण्यात आले आहेत.

दरम्यान, ११ जानेवारी जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला माँ जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या राजवाड्यापासून ते जिजाऊ सृष्टीपर्यंत मशाल यात्रा काढण्यात येऊन दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हालगीच्या निनादात महिला पारंपारिक वेष परिधान करून हातात मशाली घेऊन यात सहभागी होतात. संभाजी ब्रीगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने ही मशाल यात्रा राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत काढण्यात येते.१२ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता महापुजा, साडेसहा वाजता राजवाडा येथे शिवकिर्तन, सकाळी नऊ वाजता जिजाऊसृष्टीवर ध्वजवंदन होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तथा पुस्तकांचे प्रकाशन सोहळे होणार आहेत. सामुहिक विवाह सोहळ््यांसह विविध कार्यक्रम दुपारी दीड वाजेपर्यंत येथे चालतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता शिवधर्मपीठावरील मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, युवराज्ञी संयोगीता संभाजीराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, मधुकर मेहेकरे, मनोज आखरे यांच्यासह अन्य उपस्थित राहणार आहे. दरम्यान मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा मराठा विश्वभुषण पुरस्कार युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांना तर जिजाऊ पुरस्कार बबीताताई ताडे (अमरावती) यांना प्रदान करण्यात येईल. शेवटी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय मार्गदर्शन होईल.( शहर प्रतिनिधी )

टॅग्स :buldhanaबुलडाणाJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाSindkhed Rajaसिंदखेड राजा