शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत खांदेपालटाचे संकेत

By admin | Updated: June 2, 2015 02:19 IST

खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील नवीन चेह-यांना व तरुणांना मिळणार नेतृत्वाची संधी.

अनिल गवई /खामगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असून, जिल्ह्यातील तालुका आणि शहर अध्यक्ष पदासाठी नवीन चेहर्‍यांना संधी दिल्या जाणार असल्याचे संकेत आहे. काही ठिकाणी फेरबदल तर काही पदांवर थेट नवीन चेहर्‍यांना संधी देत, राष्ट्रवादीच्या घड्याळाची गती वाढविण्याचे वरिष्ठांचे प्रयत्न आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरून प्रयत्न केल्या जात आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अँड. नाझेर काजी यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, उपरोक्त दोन्ही नियुक्तीमुळे एप्रिल महिन्यात पार पडलेल्या संघटनात्मक निवडणुकीच्या अहवालाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जिल्हाध्यक्षापदाच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील शहर आणि तालुकाध्यक्षपदाच्या नियुक्त्यांकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धडा घेत, आगामी ग्रामपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या दमाने कामाला लागा असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ पातळीवरून स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी नवीन चेहर्‍यांना संधी देण्याचे सुतोवाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. त्यानंतर जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी निवडणूका घेण्यात आल्या. या निवडणुकीत गटातटाचे राजकारण शिगेला पोहोचले असतानाच, वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश निवडणूक पक्ष निरीक्षकांना देण्यात आले. शहर आणि तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी आपले अहवाल ९ एप्रिलनंतर वरिष्ठांकडे सादर केले. या अहवालानुसार आता जिल्हय़ातील सर्वच तालुक्यात तालुकाध्यक्ष आणि शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.