श्रीरामांचा प्रयत्नवादी प्रवास मनुष्याकडून ईश्वरत्वाकडे नेणारा : अरुण नन्हई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:00+5:302021-04-23T04:37:00+5:30
रामनवमीनिमित्त आयोजित ‘तत्त्वबोध रामायणातील प्रयत्नवादी राम’ या ऑनलाईन प्रवचनाप्रसंगी ते बोलत होते. रामनवमीनिमित्त मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठानद्वारे ऑनलाइन पद्धतीने ...

श्रीरामांचा प्रयत्नवादी प्रवास मनुष्याकडून ईश्वरत्वाकडे नेणारा : अरुण नन्हई
रामनवमीनिमित्त आयोजित ‘तत्त्वबोध रामायणातील प्रयत्नवादी राम’ या ऑनलाईन प्रवचनाप्रसंगी ते बोलत होते. रामनवमीनिमित्त मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठानद्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. अनुराधा परिवाराचे जनक कर्मयोगी सिद्धविनायक बोंद्रे यांनी जगातील अनेक रामायणांचा अभ्यास करून १० वर्षांपूर्वी ‘तत्त्वबोध रामायणाची’ निर्मिती केली आहे. हाच आधार घेत दरवर्षी रामनवमी व अनेक प्रसंगी रामायणाचे आयोजन भव्य प्रमाणावर करण्यात येते. त्यानुषंगाने यंदाच्या रामनवमीलादेखील प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या पृष्ठभूमीवर यावेळी ऑनलाईन पद्धतीने या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तत्त्वबोध रामायणाचे ग्रंथकार कर्मयोगी सिद्धविनायक बोंद्रे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या ग्रंथावर यावेळी ऑनलाईन प्रवचनमालेत विवेचन केल्या गेले. यामध्ये प्राचार्य डॉ. नन्हई यांनी रामाचा वनवास व आजचा जगातील प्रश्न, लॉकडाऊन याचे साधर्म्य विशद केले. यावेळी मौनीबाबा संस्थानचे विश्वस्त जितेंद्र बोंद्रे, मौनीबाबा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल बोंद्रे, विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, प्राचार्य डॉ.के.आर. बियाणी, डॉ. पागोरे, प्रा. यू. यू. खरात, निवृत्ती चिभडे व अनुराधा परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.