कंटेनरची धडक; पाच जखमी

By Admin | Updated: July 3, 2014 22:57 IST2014-07-03T21:07:47+5:302014-07-03T22:57:16+5:30

स्कार्पिओ वाहनाची व कंटेनरची सुलतानपूर पुलाजवळ जोरदार धडक झाली.

Shock of container; Five injured | कंटेनरची धडक; पाच जखमी

कंटेनरची धडक; पाच जखमी

मेहकर : भरधाव वेगात येणार्‍या एका स्कार्पिओ वाहनाची व कंटेनरची सुलतानपूर पुलाजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना ३ जुलै रोजी घडली.
यासंदर्भात हकीकत अशी की, मेहकरवरुन लोणारकडे जाणार्‍या स्कॉर्पिओ क्रमांक एम.एच.२८ व्ही.५११३ ला समोरुन येणार्‍या एम.एच.0४- एफ.टी.३६३४ ने सुलतानपूर पुलाजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पिओमधील सलीम खान कलीमखान (२0), महमद तौसीन म.युनूस (१९), सैय्यद वसीम सैय्यद सलीम, नसीम खान सरफराज खान (१८) व शेख मोहसिन शे.मोबीन हे पाचजण जखमी झाले. जखमींना तात्काळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तलिहिस्तोवर पोलिस तपास सुरू होता.

Web Title: Shock of container; Five injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.