चुकीच्या जागी सिमेंट नाला बांधल्यामुळे पाऊस पडताच शेतरस्ता पाण्याखाली आहे.
By Admin | Updated: June 8, 2017 15:36 IST2017-06-08T15:36:38+5:302017-06-08T15:36:38+5:30
जलयुक्त शिवार याजनेंतर्गत चुकीच्या जागी सिमेंट नालाबांधल्यामुळे पाऊस पडताच शेतरस्ता पाण्याखाली आहे.

चुकीच्या जागी सिमेंट नाला बांधल्यामुळे पाऊस पडताच शेतरस्ता पाण्याखाली आहे.
अंढेरा : जलयुक्त शिवार याजनेंतर्गत चुकीच्या जागी सिमेंट नाला
बांधल्यामुळे पाऊस पडताच शेतरस्ता पाण्याखाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना
शेतात जाण्याचा मार्गच बंद झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या ह्यजलयुक्त शिवारह्ण योजनेअंतर्गत
गावागावात मोठ्या प्रमाणात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम सुरू
आहे. या योजनेंतर्गत अंढेरा गावात सुद्धा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण
करण्यात आले. परंतु येथील शेतकरी रविराज माणिकराव देशमुख यांचे गट
क्र.२०५ मध्ये ५० आर व गट क्र.२०९ मध्ये २२ आर जमीन असून सदर जमिनीमधून
नदीचे पात्र गेलेले आहे. या नदीपात्रात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करुन
सिमेंटनाला बांधण्यात आला. परंतु, पावसाचे पाणी पडताच संपूर्ण पाणी
शेतरस्त्यावर साचले व रस्ता बंद झाला आहे. आणखी पाऊस झाल्यावर शेतामध्ये
पाणी जावून पिकांचे नुकसान होवू शकते. ३ मे २०१७ रोजी रविराज देशमुख
यांनी तहसीलदार बाजड यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. परंतु अजूनही
खडकपूर्णा प्रकल्प अभियंता कदम यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. सदर
शेतकऱ्याची पाऊलवाट (पर्यायी) करावी. सध्या पेरणीचे दिवस जवळ आले असून
शेतकऱ्यांचे समाधान करावे व रविराज माणिकराव देशमुख यांच्या शेतामध्ये
नदीचे पाणी जाणार नाही याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.