शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

शेलगाव बाजार गावावर शोककळा!

By admin | Updated: April 25, 2017 00:36 IST

धुळे-सोलापूर महामार्गावर अपघात : रात्री उशिरा मृतकांवर अंत्यसंस्कार

धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथील भजनी मंडळ पंढरपूर येथे जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाणगाव फाट्याजवळ सोमवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ट्रक व जीपचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये चार जण जागीच ठार झाले. त्यामध्ये दोन पुरुष व दोन महिला प्रवाशांचा समावेश आहे.बुलडाणा विधानसभा क्षेत्रातील २५० गाड्यांचा ताफा बुलडाणा येथून रविवारी सायंकाळी पंढरपूरसाठी रवाना झाला. यापैकी एम.एच.२८ सी २३५३ या जीप गाडीला बिडनजिक भीषण अपघात झाला. त्यामध्ये शेलगाव बाजार येथील ग्रा.पं.सदस्य पद्माकर निनाजी खर्चे (वय ४०), दिनेश निवृत्ती खर्चे (वय ५५), जया विलास चोपडे (वय ५०), अक्षदा संजय चौधरी (वय १७) यांचा जागीच मृत्यू झाला असून, यापैकी तिघेजण शेलगाव बाजार येथील रहिवासी होते. अक्षदा चौधरी ही दाताळा येथील शिक्षक संजय चौधरी यांची मुलगी होती. अपघातानंतर जखमींना बिड येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले, तर गावातील तिघांचा मृत्यूमुळे शेलगाव बाजार व परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान, आ.चैनसुख संचेती, संजय गायकवाड, खा.प्रतापराव जाधव, ना.रविकांत तुपकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, माजी आ. विजयराज शिंदे, मुक्त्यारसिंग राजपूत, अशांत वानखेडे आदींनी मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. रात्री १० वाजेच्या सुमारास मृतकांवर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी धृपतराव सावळे, अशांत वानखेडे, भोजराज पाटील यांच्यासह रावसाहेब देशमुख, योगेंद्र गोडे, ठाणेदार दीपक वळवी, संतोष तांदूळकर आदी उपस्थित होते. दुर्दैवी योगायोगदाताळा येथील अक्षदा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन मामाच्या गावाला दोन दिवसांपूर्वी आली होती. शेलगाव येथील डॉ. खर्चे यांचे पंढरपूरला जाने वेळेवर रद्द झाले, त्यांच्या जागी अक्षदा गेली आणि तिचा हा प्रवास शेवटचा ठरला. तिच्या आई-वडिलांची ती एकुलती एक मुलगी होती.