Shame: Father has been abusing girl for a years | लज्जास्पद : बाप वर्षभरापासून करत होता मुलीवर अत्याचार

लज्जास्पद : बाप वर्षभरापासून करत होता मुलीवर अत्याचार

पिंपळगाव राजा, ता. खामगाव:  एका वर्षापासून मुलीवर अत्याचार करणाºया बापाचे बिंग २२ फेब्रुवारी रोजी फुटले. याबाबत मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 
खामगाव तालुक्यातील व पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम हिवरा खुर्द येथे उघडकीस आला. पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणाºया महाराष्ट्रात अशी घटना घडणे लाजिरवाणी बाब असल्याच्या प्रतिक्रिया समाजमनातून उमटत आहेत. 
 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राम हिवरा खुर्द येथे एक कुटूंब नातेवाईकांकडे गेल्या महिनाभरापासून राहत होते. त्याठिकाणी नराधम बापाने  मुलीला धमकावत लैंगिक अत्याचार केला. कुणाला काही सांगितल्यास तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी सुद्धा त्याच्याकडून तिच्यावर अत्याचार सुरुच होता. अशाप्रकाच्या तक्रारीवरून ठाणेदार चव्हाण यांनी हिवरा खुर्द गाठून आरोपीला ताब्यात घेतले. मुलीच्या फियार्दीवरून पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम ३५४,३७६ अंतर्गत पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन चव्हाण, पो.कॉ संतोष डागोर, पो.कॉ विनोद भोजने हे करीत आहेत.

Web Title: Shame: Father has been abusing girl for a years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.