गतिमंद युवतीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: February 16, 2016 00:48 IST2016-02-16T00:48:24+5:302016-02-16T00:48:24+5:30

पातुर्डा येथील घटना; आरोपीस अटक

Sexual torture on the afflicted woman | गतिमंद युवतीवर लैंगिक अत्याचार

गतिमंद युवतीवर लैंगिक अत्याचार

संग्रामपूर (बुलडाणा) : गतिमंद असलेल्या एका २५ वर्षीय युवतीवर २६ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पातुर्डा खुर्द येथे १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी पीडित युवतीच्या आईने तामगाव पो.स्टे.ला तक्रार दिली असून, या प्रकरणी तामगाव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील मंगेश मनोहर खंडेराव (वय २६) याने एका गतिमंद व गलगंड आजार असल्यामुळे बोलता येत नसल्याचा फायदा घेत तिला गोठय़ात नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित गतिमंद युवती रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे आईने रात्री शोध घेतला असता, सदर गतिमंद युवतीवर आरोपी हा लैंगिक अत्याचार करीत असल्याचे दिसले. सदर प्रकार निदर्शनास आल्याचे पाहून आरोपी मंगेश खंडेराव हा घटनास्थळावरून पळून गेला. उपरोक्त आशयाच्या पीडित मुलीच्या आईने १५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी आरोपी मंगेश मनोहर खंडेराव याच्यावर अप.नं.२३/१६ कलम ३७६ (२), (१) भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके व इतर सहकारी पोलीस कर्मचारी हे करीत आहेत.

Web Title: Sexual torture on the afflicted woman