अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 12:06 IST2021-07-04T12:06:23+5:302021-07-04T12:06:37+5:30
Sexual abuse of a minor boy : चाकू मारण्याची भीती दाखवत त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले.

अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ
जानेफळ : जानेफळ पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करून त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. ही घटना २ जुलै रोजी दुपारी घडली.
खाऊचे आमिष दाखवू १२ वर्षीय मुलास २ जुलै रोजी दुपारी गणेश शेषराव बुटाले नाक आरोपीने जंगलात नेले. तेथे चाकू मारण्याची भीती दाखवत त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकरणी पीडिताच्या निकटवर्तीयांनी जानेफळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रकरणी जानेफळ पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.