बुलडाणा जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह; दहा जण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 11:18 IST2020-07-05T11:17:59+5:302020-07-05T11:18:08+5:30

सात अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १७८ वर पोहोचला आहे.

Seven positives in Buldana district; Ten were coronated | बुलडाणा जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह; दहा जण झाले कोरोनामुक्त

बुलडाणा जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह; दहा जण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शनिवारी प्राप्त झालेल्या १३३ अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १७८ वर पोहोचला आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये साखरखेर्डा येथील दोन, देऊळगाव राजा शहरातली सिव्हील कॉलनीमध्यी दोन व्यक्ती, आणि जळगाव खान्देश मधील असलेला पण खामगावमध्ये दाखल असलेला २८ वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील ३५ वर्षीय महिला आणि चिखलीतील १९ वर्षाच्या तरुणाचा यात समावेश आहे. दरम्यान, शनिवारी दहा जणांना सुटी झाली असून यामध्ये खामगाव येथील दोन, अकोला येथील दोन, बावनबीर येथील, शेगावातील एक, आळसणा येथील एक, सुलतानपूर येथील एक आणि मलकापूरमधील एका महिलेचा यात समावेश आहे.

 

Web Title: Seven positives in Buldana district; Ten were coronated