आणखी सात पाॅझिटिव्ह, तिघांची काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:37 IST2021-08-22T04:37:35+5:302021-08-22T04:37:35+5:30

बुलडाणा : गत काही दिवसापासून एक,दाेन रुग्ण निघत असताना शनिवारी सात जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच तीन ...

Seven more positives, three beat Kareena | आणखी सात पाॅझिटिव्ह, तिघांची काेराेनावर मात

आणखी सात पाॅझिटिव्ह, तिघांची काेराेनावर मात

बुलडाणा : गत काही दिवसापासून एक,दाेन रुग्ण निघत असताना शनिवारी सात जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच तीन जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खामगाव शहरातील भीमनगर १, तलाव रोड १, बोबडे कॉलनी १, खामगाव तालुका पिंपळगाव राजा १, कोलोरी १, दे. राजा तालुका दे. मही १, बुलडाणा शहरातील तानाजीनगरातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ६ लाख ७६ हजार ३३६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी ११५० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.

३२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ३७१ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार ६६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे ३२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Seven more positives, three beat Kareena