शेगाव कृउबास निवडणुकीसाठी ७६ उमेदवारी अर्ज दाखल

By Admin | Updated: October 16, 2016 02:17 IST2016-10-16T02:17:41+5:302016-10-16T02:17:41+5:30

छाननीदरम्यान १६ उमेदवारांच्या अर्जामध्ये त्रुटी आढल्यात.

Seven candidates filed for Shegaon Krusabas elections | शेगाव कृउबास निवडणुकीसाठी ७६ उमेदवारी अर्ज दाखल

शेगाव कृउबास निवडणुकीसाठी ७६ उमेदवारी अर्ज दाखल

शेगाव, दि. १५- शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदांसाठी २0 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शेगाव बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सहकार पॅनलकडून पांडुरंगदादा पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविल्या जात आहे तर भाजपा पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलही या निवडणुकीत आपले भाग्य आजमावित आहे. या बाजार समितीचा मागील इतिहास पाहिला तर स्व. गजाननदादा पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलचे नेहमीच वर्चस्व राहत होते. त्यानंतर पांडुरंगदादा पाटील यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. दरम्यान शनिवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान १६ उमेदवारांच्या अर्जामध्ये त्रुटी आढल्या आहेत.

Web Title: Seven candidates filed for Shegaon Krusabas elections