डॉक्टरसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 01:53 IST2016-10-23T01:53:46+5:302016-10-23T01:53:46+5:30

पत्नीने दिलेल्या छळाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी डॉक्टर पतीसह ७ जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

Seven accused with the doctor | डॉक्टरसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

डॉक्टरसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव, दि. २२- पत्नीने दिलेल्या छळाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी डॉक्टर पतीसह ७ जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जयमाला भगतसिंग दयावने (राजपूत) यांनी शनिवारी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की पती भग तसिंग भाऊलाल दयावने (राजपूत) हे मानसिक छळ करून माझ्या घरून निघून जा, असे म्हणून मारहाण करतात. तसेच आशिष दयावने, शालिनी रत्नेश्‍वरसिंह दयावने, मीराबाई प्रेमसिंह दयावने, भागाबाई मोतीलाल कुठुंबरे, प्रेमसिंह भाऊलाल दयावने व उदय चंद्रसिंह राजपूत हे शिवीगाळ आणि धमकी देत होते. अशा आशयाच्या तक्रारीवरून तसेच महिला सुरक्षा सेल पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशावरून पोलिसांनी उपरोक्त सात जणांविरुद्ध कलम ४९८ (अ), ३२३, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Seven accused with the doctor