शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

संत गजानन भक्तांची मुस्लिम बांधवांकडून सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 4:26 PM

विदर्भ पंढरीच्या वाटेवर असलेल्या या दिंड्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी विविध समाजपयोगी संस्था आणि वारकरी असतानाच सर्वधर्मसमभावाचा परिचय देत मुस्लिम बांधवांकडून 'सेवा परमो धर्म' हा मंत्र कृतीत उतरविण्यात येत आहे

- अनिल गवईखामगाव:- 'सबसे अच्छा मानव वह है जो मानव जाति की सेवा करता  है!' या  ओळी कृतिशीलतेतून प्रत्यक्षात उतरवित मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांच्या सेवेचा अनोखा पायंडा  पाडल्याचे दिसून येते. विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त विदर्भ,मराठवाडा,आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या विदर्भ पंढरी शेगावच्या दिशेने निघालेल्या आहेत. विदर्भ पंढरीच्या वाटेवर असलेल्या या दिंड्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी विविध समाजपयोगी संस्था आणि वारकरी असतानाच सर्वधर्मसमभावाचा परिचय देत मुस्लिम बांधवांकडून 'सेवा परमो धर्म' हा मंत्र कृतीत उतरविण्यात येत आहे. शेगावच्या प्रवेश प्रवेश द्वारावरच भाविकांसाठी चहा-नाश्ता फराळ आणि गुलाबाचे सरबत आदी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारकर्‍यांसाठी मोफत दवाखानाही मुस्लिम समाज बांधवांकडून सज्ज ठेवण्यात आला आहे. अतिशय आपुलकीच्या या पाहुणचारामुळे वारकरीही भारावले जात आहेत.  शनिवारी सायंकाळपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याचा मनोदय मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला आहे. हाजी इमरान यांच्या मार्गदर्शनात मौलाना आबिद,  साबीर शेख, मोलाना इंजमाम, शोएब भाई, मौलाना हबीब, अब्दुल कादिर, मौलाना रशीद भाई,  गुलशन भाई,  असलम भाई ,रियाज जमादार  डॉक्टर नवाब कुरेशी,  अमिन भाई मौलाना रियाज भाई,आदी वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटताहेत.

वैद्यकीय सेवेचा लाभ!संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी देखील मौलवींची एक चमू सज्ज झाली आहे. चहा नाश्ता फराळासोबतच वारकऱ्यांच्या प्रथम उपचाराची ही योग्य ती सेवा या मौलवीकडून दिल्या जात आहे. सोबतच मोफत औषध उपचार ही अनेक वारकऱ्यांवर करण्यात येत आहे.

पृथ्वीवरील सर्वच एकाच ईश्वराची अल्ल्हाची लेकरे आहेत.कोणताही धर्म तिरस्काराची शिकवण देत नाही. सेवा हाच प्रत्येक धर्माचा आधार आहे. भाविकांच्या सेवेतून सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.

- हाजी इमरान, समाज सेवक

संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दिंडीत सहभागी झालो. मुस्लिम बांधवांकडून करण्यात आलेल्या सेवेमुळे आपण भारावलो आहोत.

- गजानन सूर्यवंशी, वारकरी चिचखेडा,तालुका जामनेर जिल्हा जळगाव

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजkhamgaonखामगावShegaonशेगावReligious programmeधार्मिक कार्यक्रम