संतोष महाराजांना सेवक पुरस्कार

By Admin | Updated: July 2, 2014 00:36 IST2014-07-01T22:59:20+5:302014-07-02T00:36:23+5:30

आदिवासी विभागाने आदिवासी सेवक पुरस्कार देवून सन्मानित केले.

Servant Award for Santosh Maharaj | संतोष महाराजांना सेवक पुरस्कार

संतोष महाराजांना सेवक पुरस्कार

बुलडाणा : तालुक्यातील शिरपूर येथील शेषराव महाराज व्यसनमुक्ती संस्थान व प.पू.शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी संतोष महाराज यांना ३0 जून २0१४ रोजी महाकवी कालीदास कलामंदिर नाशिक येथे शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाने आदिवासी सेवक पुरस्कार देवून सन्मानित केले.
या कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना.छगन भुजबळ, ना.वसंतराव पुरके, ना.पद्माकर वळवी, ना.मधुकरराव पिचड, ना.राजेंद्र गावीत, ङ्म्रीमती जयङ्म्री पवार, यतीन वाघ, हेमंत गोंडसे, खा.हरिचंद्र चव्हाण, डॉ.संजीव कुमार, मुकेश खुल्लर आदींची उपस्थिती होती.
या पुरस्काराचे स्वरुप म्हणजे शाल, ङ्म्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रु.१000१ रुपये रोख देण्यात आले. तसेच पुरस्कार विजेत्यांना महाराष्ट्र शासनाकडून दोन व्यक्तींसाठी मोफत एस.टी.प्रवासाची सुविधा तसेच महाराष्ट्रामध्ये कोठेही शासकीय विङ्म्रामगृहामध्ये मुक्कामाला राहण्याची व्यवस्था हय़ा सुविधा देण्यात आल्या आहेत.
संतोष महाराज यांनी त्यांच्या वडीलांच्या पश्‍चात २00१ पासून व्यसनमुक्तीचे कार्य सुरु केले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपर्‍यामध्ये तसेच इतर राज्यामध्येही शेकडो व्यसनमुक्ती मेळावे भरवून लाखो लोकांना व्यसनापासून मुक्त केले. महाराजांना या अगोदर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून २00१२-१३ या वर्षाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळालेला आहे.
प.पू.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संस्था शिरपूर ही संस्था १९९९ पासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या संस्थेच्या माध्यमातून व प्रबोधनातून लाखो आदिवासी लोक व्यसनमुक्त झालेले आहेत. यावेळी संस्थानचे संचालक अँड.विजय शेषराव शेळके तथा व्यसनमुक्ती संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रविंद्र चौधरी आणि संस्थानचे सहकारी गजानन माणिकराव शेळके शिरपूर यांनी संस्थानचे प्रतिनिधी म्हणून शासनाकडून पुरस्कार स्विकारला. संस्थेला या अगोदर २0१२-१३ मध्ये सामाजिक न्याय विभागाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे.

Web Title: Servant Award for Santosh Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.