बस-दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी

By Admin | Updated: August 6, 2016 02:13 IST2016-08-06T02:13:54+5:302016-08-06T02:13:54+5:30

दुचाकीस्वार माजी सैनिक; मुलीची भेट घेऊन घराकडे येत असताना झाला अपघात.

A seriously injured in a bus and a bike accident | बस-दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी

बस-दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी

मोताळा (जि. बुलडाणा), दि. ५ : बुलडाणा शहराबाहेरच्या मलकापूर मार्गावरील एका हॉटेलनजिक ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास बस व दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात आडविहीर (मोताळा) येथील माजी सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.
एसटी महामंडळाची वाशिम ते मलकापूर बस (एमएच.४0-वाय-५६९२) प्रवासी घेऊन बुलडाणा येथून मलकापूरला येत होती. दरम्यान, आडविहीर येथील माजी सैनिक ज्ञानदेव ऊर्फ प्रदीप निनाजी तळोले (वय ५८) हे बुलडाणा येथून आपल्या मुलीची भेट घेऊन दुचाकीने (एमएच-२८-जी-६१४३) घराकडे येते होते. दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास बस व दुचाकीत अपघात झाला. अपघातात ज्ञानदेव तळोले यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे, तर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरली. अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ अँम्बुलंसमध्ये जखमी तळोले यांना बुलडाणा येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Web Title: A seriously injured in a bus and a bike accident