उपसभापतींच्या राजीनाम्यामुळे लोणार तालुक्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:32 IST2021-03-28T04:32:57+5:302021-03-28T04:32:57+5:30

गत चार वर्षांपूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. लाहोटी यांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून व खा. प्रतापराव ...

Sensation in Lonar taluka due to resignation of Deputy Speaker | उपसभापतींच्या राजीनाम्यामुळे लोणार तालुक्यात खळबळ

उपसभापतींच्या राजीनाम्यामुळे लोणार तालुक्यात खळबळ

गत चार वर्षांपूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. लाहोटी यांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून व खा. प्रतापराव जाधव व आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनात सर्कलमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. सर्व काही सुरळीत असताना शिवसेनेत गत ३० वर्षांपासून सक्रिय असलेल्या डॉ. लाहोटींनी शुक्रवारी अचानक राजीनामा देत राजकीय भूकंप केला. त्यामुळे लोणार तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या सुलतानपूर सर्कलमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कोट...

यापुढे आपण तालुकास्तरीय सभांना हजर राहून राजकारणाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे पं. स. सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

-डॉ . हेमराज लाहोटी , पंचायत समिती सर्कल सुलतानपूर

.

कॅप्शन : डॉ. हेमराज लाहोटी यांचा फोटो .

Web Title: Sensation in Lonar taluka due to resignation of Deputy Speaker