मंगेश शेटे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:37 IST2021-02-05T08:37:19+5:302021-02-05T08:37:19+5:30

लोणार तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर रुस्तुमराव दहातोंडे यांचे अकाली निधन झाल्याने बुलडाणा जिल्हा ग्रंथालय संघाच्या अंतर्गत लोणार तालुका ...

Selection of Mangesh Shete | मंगेश शेटे यांची निवड

मंगेश शेटे यांची निवड

लोणार तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर रुस्तुमराव दहातोंडे यांचे अकाली निधन झाल्याने बुलडाणा जिल्हा ग्रंथालय संघाच्या अंतर्गत लोणार तालुका ग्रंथालय संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी लोणार येथे नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. या वेळी बुलडाणा जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ लक्ष्मण सानप हे अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष पदासाठी मंगेश प्रल्हादअप्पा शेटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी राजाराम उकंडा राऊत, सचिव नूर मोहम्मद शेख सत्तार, सहसचिव सुनील सुरेश कायंदे तर सदस्य सुभाष भगवान मुंढे, अनिल सिद्धेश्वर दहातोंडे, विलास जगनराव तेजनकर, सुभाष मोतिराम मोरे, सीमा पंढरीनाथ सानप यांची निवड करण्यात आली. ही निवड तीन वर्षांसाठी राहणार आहे.

Web Title: Selection of Mangesh Shete