शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून

By Admin | Updated: June 10, 2017 01:53 IST2017-06-10T01:53:30+5:302017-06-10T01:53:30+5:30

मलकापूर तहसील कार्यालयावर निदर्शने केली जाणार.

The second phase of the farmers' agitation from Monday | शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून

शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून

मलकापूर : शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा १२ जून सोमवारपासून सुरू होणार असून, मलकापुरा त सकाळी ११ वा. तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांची निदर्शने केली जाणार आहेत.
या आंदोलनात शेतकरी संघटनांचे सर्व गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, कवाडे गट आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती शेतकरी नेते अँड.साहेबराव मोरे यांनी दिली आहे.
शेतकर्‍यांचे सरसकट कर्जमाफ व्हावे, त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित व नफा असा भाव मिळावा, यातील कोणतीही मागणी मंजूर करीत नसल्यामुळेच शेतकरी संपाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: The second phase of the farmers' agitation from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.