प्लॉट खरेदी-विक्री प्रकरणी मुळ मालकांचा शोध युध्दपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 06:53 PM2020-02-11T18:53:28+5:302020-02-11T18:53:33+5:30

प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार राजेश चोपडे याला अटक करण्यात आल्यानंतर या घोटाळ्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात येत आहे.

The search for the original owner in case of plot buying scam | प्लॉट खरेदी-विक्री प्रकरणी मुळ मालकांचा शोध युध्दपातळीवर

प्लॉट खरेदी-विक्री प्रकरणी मुळ मालकांचा शोध युध्दपातळीवर

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार राजेश चोपडे याला अटक करण्यात आल्यानंतर या घोटाळ्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात येत आहे. या घोटाळ्याशी संबंधित ३० बुक तहसीलच्या अभिलेख कार्यालयातून पोलिसांनी जप्त केले आहेत.
प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार निलंबित तलाठी राजेश चोपडे गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. ६ फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांनी त्याला अटक केली. ७ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची म्हणजेच १२ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  कोठडीत पोलिसांनी चोपडेला बोलतं केले असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. दरम्यान, फसवणूक आणि प्लॉट खरेदी विक्री संदर्भातील ९४ प्रकरणांचा कसून तपास पोलिसांकडून केला जात आहे. खाडाखोड, मालमत्ता हस्तांतरण आणि हस्तातरीत झालेल्या मालमत्तेत मुळमालक कोण? याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याचवेळी मुळ हस्तलिखित बुक, गट बुक आणि या प्रकरणाशी संबंधित ३० बुक पोलिसांनी जप्त केलेत.
 
तपासासाठी दोन पथके गठीत!
खामगावातील कोट्यवधी रुपयांच्या प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्याच्या तपासासाठी शहर पोलिसांकडून युध्दपातळीवर प्रयत्न केला जात आहे. तपासासाठी शहर पोलिसांनी प्रत्येकी ४ पोलिसांचा समावेश असलेली दोन पथके तयार केलीत. स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाºयांचा यामध्ये समावेश आहे.
 

 
राजेश चोपडेच्या पोलिस कोठडीला आणखी दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. घोटाळ्याच्या तळाशी जाण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत.
- सुनील अंबुलकर
पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन खामगाव.

Web Title: The search for the original owner in case of plot buying scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.