स्कॉर्पिओ उलटली; तीन जखमी

By Admin | Updated: September 15, 2016 01:55 IST2016-09-15T01:55:30+5:302016-09-15T01:55:30+5:30

देऊळघाट मार्गावर अपघात; चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात.

Scorpio Uletle; Three injured | स्कॉर्पिओ उलटली; तीन जखमी

स्कॉर्पिओ उलटली; तीन जखमी

बुलडाणा, दि. १४ - देऊळघाट मार्गावरील शेतकी शाळेजवळ स्कॉर्पिओ गाडी उलटल्याने यातील प्रवासी जखमी झाले. यात दोन पुरुष आणि दोन बालकांचा समावेश आहे. अनियंत्रित झालेल्या या गाडीने रस्त्यावरील इलेक्ट्रिकचा खांबाही तोडला.
प्राप्त माहितीनुसार, स्कॉर्पिओ क्र.एपी २४-३३३२ ही गाडी स्टेअरिंगवरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. ही गाडी मो.जावेद चालवित होते. गाडी उलटल्यामुळे झालेल्या अपघातात शेख अकील शेख कदीर (वय ३५) रा.वाआणि दिनेश गणेश धामोने (वय २0) हे जखमी झाले.
त्यांना येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. याच गाडीत तीन बालकेही बसलेले होती, त्यांनासुद्धा किरकोळ मार लागला आहे.

Web Title: Scorpio Uletle; Three injured