विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:44 IST2017-12-30T00:44:44+5:302017-12-30T00:44:56+5:30
पंचायत समिती अंतर्गत तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी येथील श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीचा समारोप गुरूवारी करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.

विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : पंचायत समिती अंतर्गत तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी येथील श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीचा समारोप गुरूवारी करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. उपसभापती मनोज दुनेदार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी पं. स. सभापती प्रभाकर तुलावी, शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये, माजी पं. स. सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक नागेश्वर फाये, मुख्याध्यापक पी. डब्ल्यू. भरणे उपस्थित होते. प्रदर्शनात इयत्ता नववी ते बारावीच्या गटात प्रथम क्रमांक श्रीराम विद्यालयाची ऋतुजा अरूण कोडापे, द्वितीय क्रमांक विद्याभारती विद्यालयाचा पारिजातक बावनथडे, तृतीय क्रमांक रामगड आश्रमशाळेचा शेषराव गावडे, आदिवासी गटातून प्रथम क्रमांक श्रीराम महाविद्यालयाचा यश बारीकराव पंधरे याने पटकाविला. इयत्ता सहावीच्या आठवीच्या गटात प्रथम क्रमांक रोशनी धनराज दरवडे, द्वितीय लक्ष्मी राजकुमार नरोटे जि. प. शाळा दादापूर, तृतीय क्रमांक शिवाजी हायस्कूल कुरखेडाची तृप्ती यादव बाळबुद्धे, आदिवासी गटातून प्रथम क्रमांक नान्ही जि. प. शाळेचा प्रवीण संतोष सिंद्राम यांनी पटकाविला. शैक्षणिक साहित्य निर्मितीत हायस्कूल गटात देऊळगावचे दिलीप अहुजा, लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात पी. डी. बोळणे, शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटात नरहरी रामटेके यांनी अव्वल स्थान पटकाविले.
कार्यक्रमाचे संचालन श्याम सोनुले, प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शिवणकर तर आभार एस. पी. बांगरे यांनी मानले.