डोणगावच्या जि.प.शाळेने शासन चालविणारे विद्यार्थी घडविलेले - रमेश सावजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:56 IST2018-01-29T13:54:53+5:302018-01-29T13:56:03+5:30
डोणगाव : स्थानिक डोणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १५० वर्षात अनेक विद्यार्थी शिकून मोठ-मोठे अधिकारी तर झालेच; त्याचबरोबर राजकीय पुढारी होऊन महाराष्ट्र शासनाने मंत्री होवून शासन चालविणारे विद्यार्थी घडविल्याचे प्रतिपादन कृषी उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त रमेश सावजी यांनी केले.

डोणगावच्या जि.प.शाळेने शासन चालविणारे विद्यार्थी घडविलेले - रमेश सावजी
डोणगाव : स्थानिक डोणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १५० वर्षात अनेक विद्यार्थी शिकून मोठ-मोठे अधिकारी तर झालेच; त्याचबरोबर राजकीय पुढारी होऊन महाराष्ट्र शासनाने मंत्री होवून शासन चालविणारे विद्यार्थी घडविल्याचे प्रतिपादन कृषी उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त रमेश सावजी यांनी केले. जिल्हा परिषद शाळेला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी रमेश सावजी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, पं.स.सदस्य निंबाजी पांडव, मेहकर पं.स.सभापती जयाताई खंडारे, उपसभापती राजूभाऊ घनवट, जि.प.सदस्य प्रा.आशिष रहाटे, गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, डोणगांवच्या सरपंच अनुराधा धांडे, उपसरपंच जुबेर खान, श्री शिवाजी शिक्षण संस्था डोणगावचे अध्यक्ष राजेंद्र आखाडे, मा.पं.स.सदस्य प्रकाश पळसकर, व्यवस्थापक समिती अध्यक्ष दिनेश पवार, बळीरामजी बाजड, माजी प्राचार्य जिवनसिंह दिनोरे, डॉ.संगीता धाडकर आदी होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स.ना.पादे यांनी शाळेला १५० वर्ष पूर्ण झाले व या शाळेतून शिक्षण घेऊन ज्यांनी राजकीय, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण क्षेत्रात कार्य केले अशा शतकोत्तर सोहळ्यात ७० माजी विद्यार्थी व ३० आजी विद्यार्थ्यांचा सत्कार करणार असल्याचे सांगून शाळेची १५० वर्षाची यशोगाथा सांगितली.