The school bus crushed the boy | स्कूल बसने बालकास चिरडले
स्कूल बसने बालकास चिरडलेलोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्कूल बसने एका बालकास चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी घाटपुरी येथे घडली. या घटनेमुळे घाटपुरी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
अथर्व निलेश मगर (वय- दीड वर्ष) हा दुपारी घरासमोर खेळत होता. त्याचवेळी दिलीप काशीनाथ सोनोने (३६) याने आपल्या ताब्यातील एमएच ३० एटी ५४७ क्रमांकाचे वाहन निष्काळजीपणे चालवित बालकास धडक दिली. त्यानंतर काही अंतरापर्यंत त्यास फरफटत नेले, यात गंभीररित्या चिरडल्याने बालकाचा करूण अंत झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेत बालकास एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी दत्ता श्रीराम साठे (३६) रा. घाटपुरी यांनी शिवाजी नगर पोलीसात तक्रार दिली या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी दिलीप काशीनाथ सोनोने रा. घाटपुरी याच्या विरूध्द भादंविच्या कलम २८९, ३०४ अ, मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. चालकास शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: The school bus crushed the boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.