शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:41 IST2017-09-22T00:40:59+5:302017-09-22T00:41:08+5:30
जळगाव जामोद: तालुक्यातील व शहरातील रुग्णाच्या सोयीचे व उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या येथील शासकीय रुग्णालयात सध्या अनेक आजारांच्या औषधीचा तुटवडा असून, टायफाइडसारख्या आजराच्या रक्त त पासणीकरिता लागणारी कीट गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी पॅ थोलॉजी लॅबवर खर्च करून रक्त तपासणी करावी लागत आहे.

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: तालुक्यातील व शहरातील रुग्णाच्या सोयीचे व उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या येथील शासकीय रुग्णालयात सध्या अनेक आजारांच्या औषधीचा तुटवडा असून, टायफाइडसारख्या आजराच्या रक्त त पासणीकरिता लागणारी कीट गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी पॅ थोलॉजी लॅबवर खर्च करून रक्त तपासणी करावी लागत आहे.
सध्याच्या वातावरणामध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून, टायफॉइड, अचानक थंडी वाजून ताप येणे, एन १ एच १ स्वाइन फ्लूसारख्या आजारांची साथ सुरू आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. आर्थिकदृष्ट्या अक्षम असणार्या रुग्णांची शासकीय रुग्णालयाकडे उपचार करण्यासाठी नेहमी धाव असते; परंतु अपूर्ण सेवांमुळे अशा रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन शासकीय रुग्णालयात त्वरित औषधांचा साठा आणि वेगवेगळ्या आजारांच्या रक्त तपासणी किट उपलब्ध कराव्या, अशी मागणी रुग्णांकडूण केली जात आहे.
संसर्गजन्य आजारात वाढ
गत काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण राहत असून, यामुळे विविध आजार बळावले आहेत. यात संसर्गजन्य रोगांचासुद्धा समावेश आहे. स्वाइन फ्लूसारख्या जीवघेण्या आजारानेसुद्धा मृत्यू होत आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळणे व रोगाचे निदान होणे आवश्यक आहे. संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.