सरपंचास जीवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: July 16, 2017 02:24 IST2017-07-16T02:24:59+5:302017-07-16T02:24:59+5:30

शिपायासह सरपंचास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १५ जुलै रोजी सकाळी घडली.

Sapanchas threatens to kill | सरपंचास जीवे मारण्याची धमकी

सरपंचास जीवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा : ग्राम अंचरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात शौचालयास बसल्याच्या कारणावरून हटकले असता शिपायासह सरपंचास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १५ जुलै रोजी सकाळी घडली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात शौचालयास उघड्यावर बसणार्‍या एका महिलेस ग्रा.पं.लिपिक राजेंद्र खरात यांनी गावात ग्राम स्वच्छता अभियान असून तुम्ही यापुढे येथे शौचालयास बसू नये, असे सांगितले. या कारणावरून परमेश्‍वर परिहार, प्रकाश परिहार यांनी शिपाई विष्णु परिहार, सरपंच राधाबाई हनवते यांना लोटपाट करून अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात राजेंद्र खरात यांनी अंढेरा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी परमेश्‍वर परिहार, कुशिवर्ता परिहार, प्रकाश परिहार यांच्याविरूध्द कलम २९४, ३२३, ५0६, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ नवृत्ती पोफळे करीत आहेत.

Web Title: Sapanchas threatens to kill