संत गजानन महाराजांची पालखी शेगावला परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:00 IST2017-07-31T03:00:03+5:302017-07-31T03:00:03+5:30

आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होऊन श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी शेगावात पोहचली. यावेळी गजाननाच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली होती.

santa-gajaanana-mahaaraajaancai-paalakhai-saegaavalaa-paratalai | संत गजानन महाराजांची पालखी शेगावला परतली

संत गजानन महाराजांची पालखी शेगावला परतली

गजानन कलोरे ।
शेगाव (बुलडाणा) : आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होऊन श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी शेगावात पोहचली. यावेळी गजाननाच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली होती.
दरवर्षी प्रमाणे पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून ३१ मे रोजी मार्गस्थ झाली होती. शनिवारी पालखी खामगावात मुक्कामी होती. रविवारी पहाटे पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली; त्यावेळी खामगाव येथून हजारो भाविक वारीत सहभागी झाले होते. पालखीत भक्तांचा अभूतपूर्व सहभाग असल्याने खामगाव ते शेगाव मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. दुपारी २ वाजता श्रींची पालखी नगरपरिक्रमेकरिता मुख्यमार्गाने मार्गस्थ झाली.

Web Title: santa-gajaanana-mahaaraajaancai-paalakhai-saegaavalaa-paratalai