संग्रामपूर : मतदारांनी दिली नवख्या उमेदवारांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:07 IST2017-10-10T01:07:13+5:302017-10-10T01:07:37+5:30
संग्रामपूर: तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीची निवडणुकीची मतमोजणी झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये मतदारांनी नव्या चेहर्यांना संधी दिली असल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले.

संग्रामपूर : मतदारांनी दिली नवख्या उमेदवारांना संधी
अमोल ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीची निवडणुकीची म तमोजणी झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये मतदारांनी नव्या चेहर्यांना संधी दिली असल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले.
तालुक्यातील क्रमांक दोनची व मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पातुर्डा बु. ग्रामपंचायतीच्या निवडणुकी जिल्हा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांच्या मोठय़ा वहिनी शैलजा प्रकाश भोंगळ या २६ मतांनी विजयी झाल्या. तर काकोडा ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच शत्रुघ्न मानखैर यांच्या अर्धांगिनी पर्वणी शत्रुघ्न मानखैर विजयी झाल्या. त्यांना एकूण २४६ मते मिळाली. तर सांसद आदर्श ग्राम करमोडा ग्राम पंचायतीमध्ये विद्यमान सरपंच स्नेहा राजेश वर्गे यांना मतदारांनी परत निवडून दिले. भोन ग्रामपंचायतीमध्ये कृउबासचे सभापती श्रीकृष्ण तराळे यांच्या अर्धांगिनी वेणू श्रीकृष्ण तराळे विजयी झाल्या त्यांना एकूण ४६२ मते मिळाली. धामणगाव ग्रामपंचाय तीमध्ये विद्यमान सरपंच राजकन्या अजाबराव गोतमारे यांचे पती अजाबराव नामदेव गोतमारे विजयी झाले त्यांना ५५४ मते मिळाली. सावळी ग्रामपंचायतीमध्ये शुभांगी प्रकाश अरबट या सरपंचपदी विजयी झाल्या. त्यांना २३६ मते मिळाली. पेसोडा ग्रामपंचायतीमध्ये ज्योती अनंता भिसे या विजयी झाल्या. त्यांना ५५९ मते मिळाली. जस्तगाव ग्रामपंचायतमध्ये तुळशीराम पांडुरंग वानखडे विजयी झाले. त्यांना २८७ मते मिळाली. टाकळी पंच ग्रामपंचायतमध्ये पुष्पा पंजाबराव वानखडे या विजयी झाल्या. त्यांना ३८६ मते मिळाली. काटेल ग्रामपंचायतमध्ये शत्रुघ्न वामनराव डामरे विजयी झाले. त्यांना २६0 मते मिळाली. एकलारा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी रमेश पांडुरंग पवार विजयी झाले त्यांना ९८७ एवढी सर्वात जास्त मते मिळाली. १८ सरपंचा पैकी त्यांनी सर्वात जास्त मते मिळवली आहेत. तर कोलद ग्राम पंचायतीमध्ये अर्चना सुभाष तायडे हय़ा सरपंचपपदी विजयी झाले. त्यांना ३३५ मते मिळाली. वडगाव वाण ग्रामपंचायतीमध्ये रूपाली प्रशांत राऊत या सरपंचपदी विजयी झाल्या त्यांना ५00 मते मिळाली. पिंप्री काथरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवडणूक अटीतटीची झाली. त्यामध्ये छाया रवींद्र धामोळे यांचा १ मताने विजय झाला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश टापरे यांचा १ मताने पराभव झाला. चोंढी ग्रामपंचायतीमध्ये मनकर्णा सदाशिव गव्हांदे हय़ा सरपंचपदी विजयी झाल्या. त्यांना ४२३ मते मिळाली. मनार्डी ग्रा.पं.मध्ये सविता बळीराम दांडगे सरपंचपदी विजयी झाल्या.
-