संग्रामपूर: 'कोरोना फायटर्स'वर पुष्पांचा वर्षाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:50 IST2020-04-12T16:50:32+5:302020-04-12T16:50:55+5:30
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी वरवट बकाल येथे पुष्प वर्षाव करून अनेकांचे स्वागत करण्यात आले.

संग्रामपूर: 'कोरोना फायटर्स'वर पुष्पांचा वर्षाव!
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: कोरोना संचारबंदीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या कोरोना फायटर्स (माणसातील देवदूतांवर) शनिवारी पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. प्रेस क्लबच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदविला. वरवट बकाल येथे यावेळी सोशल डिस्टनसिंगची योग्य ती खबरदारी घेण्यात आली.
कोरोनाच्या संकट काळात प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी वरवट बकाल येथे पुष्प वर्षाव करून अनेकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तामगावं पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व कर्मचारी वृंद , संग्रामपुर तहसिलचे प्रभारी तहसिलदार समाधान राठोड व प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयुर वाडे यांचा सन्मान केला. यावेळी शिक्षिका सौ पुष्पाताई भोजने यांनी औक्षण केले. तर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाऊ भोजने, हमीद पाशा ,सरपंच श्रीकृष्ण दातार, पोलिस पाटील इंगळे , पत्रकार किशोर खडे, शेख अनिस, चंद्रप्रकाश कडू, सुनिल ढगे, सचिन पाटील, संगितराव भोंगळ, संतोष इघोकार, अभयसिंह मारोडे, विठ्ठल निंबोळकार, बाबुलाल इंगळे, महम्मद भाई आदी उपस्थित होते.
प्रशासकीय दाम्पत्याचा अमिभान!
बुलडाणा जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या जळगाव आणि संग्रामपूर येथे येण्यास सहजासहजी अधिकारी आणि कर्मचारी तयार होत नाहीत. मात्र, कोरोना संचारबंदी काळात उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर यांनी सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना अल्पावधीत कामाला लावले. तर पोलिस प्रशासनानेही उपविभागीय महसूल अधिकारी यांना साथ देत तालुक्यात आदरयुक्त भीती निर्माण करीत आपदकालीन तथा जीवनावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचे काम केले आहे. तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जा. वैशाली देवकर हे पती पत्नी अतीतटीच्या स्थितीत गाव, खेड्या, वस्त्यावर फिरून प्रशासनाला तयार ठेवले आहे. त्यामुळे या दाम्पत्याचाही सत्कार करण्यात आला.