संग्रामपूर: आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 16:17 IST2020-06-28T16:13:56+5:302020-06-28T16:17:03+5:30

आरोग्य विभागात दोन कोरोना बाधीत झाल्याने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Sangrampur: Employe working in the health department is positive | संग्रामपूर: आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

संग्रामपूर: आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

संग्रामपूर:- संग्रामपूर आरोग्य विभागात पुन्हा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि. २६ रोजी येथील १०८ रूग्नवाहीकेवरील डॉक्टर पाॅझीटीव्ह आला होता. खबरदारी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य विभागातील १० जणांचे स्वाॅब नमुने घेण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. दहापैकी नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून संग्रामपूर आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी कोरोना पाॅझीटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाकडून या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचे शोध घेणे सुरू आहे. सदर कर्मचारी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी असून त्याच्या घरा जवळील परिसर सील करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मयूर वाडे यांनी दिली आहे. आरोग्य विभागात दोन कोरोना बाधीत झाल्याने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Sangrampur: Employe working in the health department is positive