दाखल नसलेल्या प्रकरणात सानंदांनी मिळविला जामीन

By Admin | Updated: April 28, 2017 00:48 IST2017-04-28T00:48:59+5:302017-04-28T00:48:59+5:30

खामगाव : शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या आशंकेने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गुरूवारी खामगाव न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला.

Sanand gets admitted in a non-filing case | दाखल नसलेल्या प्रकरणात सानंदांनी मिळविला जामीन

दाखल नसलेल्या प्रकरणात सानंदांनी मिळविला जामीन

खामगाव : शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या आशंकेने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गुरूवारी खामगाव न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला.
खामगाव पालिकेने २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत शिवाजी व्यायाम मंदीर संदर्भातील ठराव पारीत केला. यामध्ये पोलिसात तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता लक्षात घेता, दिलीप सानंदा यांच्यासह शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा यांनीही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. याप्रकरणी खामगाव न्यायालयाने दिलीप सानंदा यांच्यासह गोकुलचंद सानंदा यांना २८ फेब्रुवारी रोजी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला हजर राहण्यासोबतच बोलावले त्यावेळी हजर राहण्याच्या सशर्त अटीवर ४ मे पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सानंदा यांच्यावतीने अ‍ॅड. एस.टी. जोशी यांनी काम पाहिले. दाखल नसलेल्या प्रकरणात सानंदानी जामीन मिळविल्याने, राजकीय वर्तूळात उलट-सुलट चर्चांना पेव फुटले आहे.

शहरातील एका व्यायाम शाळा प्रकरणी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधात ठराव घेतला आहे. केंद्र आणि राज्यात त्याच पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे राजकीय दबावातून गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने, अटकपूर्व जामीनाचा कायदेशीर मार्ग आपण अवलंबिला आहे.
- दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार, खामगाव.

Web Title: Sanand gets admitted in a non-filing case