Samruddhi Mahamarg Accident: बर्वे-बोरुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अर्टिगा तीन-चारवेळा उलटली, समृद्धी महामार्गावरील अपघातात मृतांची नावे...
By संदीप वानखेडे | Updated: March 12, 2023 13:37 IST2023-03-12T13:37:14+5:302023-03-12T13:37:46+5:30
समद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार तर सात जखमी. शिवणी पिसा नजीकची घटना

Samruddhi Mahamarg Accident: बर्वे-बोरुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अर्टिगा तीन-चारवेळा उलटली, समृद्धी महामार्गावरील अपघातात मृतांची नावे...
मेहकर (बुलढाणा) : समृद्धी महामार्गावर भरधाव इरटिका कार उलटल्याने सहा जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ १२ मार्च राेजी सकाळी ८ वाजता घडली. चार जणांचा जागीच तर दाेन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये हाैसाबाई भरत बर्वे (वय ६५), श्रद्धा सुरेश बर्वे (वय २८), किरण राजेंद्र बाेरुडे (वय २८), प्रमिला राजेंद्र बाेरुडे (वय ५२), भाग्यश्री किरण बाेरुडे (वय २५), जान्हवी सुरेश बर्वे (वय ११) सर्व रा़ एन ११ हुडकाे, छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील बाेरुडे आणि बर्वे कुटुंब शेगाव येथे अर्टिगा कारने रविवारी सकाळी जात हाेते़ दरम्यान, मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ असलेल्या पुलाजवळील खचक्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले़ त्यामुळे कार रस्त्याच्या मधाेमध असलेल्या मिडीयमध्ये शिरल्याने उलटली. तीन ते चार वेळा उलटल्याने कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला फेकली गेली़. यामध्ये चार जण जागीच ठार तर दाेन जणांचा मेहकर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात हलवले़.
जखमींमध्ये कार चालक सूरेश भरत बर्वे (वय ३५) , नम्रता रविंद्र बर्वे (वय ३२),इंद्र रविंद्र बर्वे (वय १२), साैम्य रविंद्र बर्वे (वय ४ वर्ष), जतीन सुरेश बर्वे (वय ४ वर्ष), वैष्णवी सुनील गायकवाड (वय १९ वर्ष), यश रविंद्र बर्वे (वय १०) आदींचा समावेश आहे़. या जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. अपघातस्थळी पाेलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी पाहणी केली. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मेहकर तालुका शिवसेना प्रमुख सुरेशतात्या वाळूकर, जयचंद बाटीया, प्रा़ आशिष देशपांडे,विलास आखाडे ,सागर कडभणे, नवंदु चौधरी, नायब तहसीलदार अजय पिम्परकर, डॉ़ योगीता शेजुळ, एएनएम चराटे , गजानन सौभागे आदींसह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली़