खामगावात पिस्तूल विक्री; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:19 IST2017-10-14T01:19:42+5:302017-10-14T01:19:54+5:30
खामगाव : सांगली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेल्या पिस्तूल विक्रीप्रकरणी खामगावातून एका संशयितास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

खामगावात पिस्तूल विक्री; एकास अटक
ठळक मुद्देसांगली पोलिसांनी खामगाव येथे येऊन केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सांगली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेल्या पिस्तूल विक्रीप्रकरणी खामगावातून एका संशयितास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सांगली पोलिसांनी पिस्तूल घेऊन जाणार्यांना पकडले होते. त्यांच्या ताब्यातून ३२ पिस्तूल जप्त करण्यात आल्या होत्या. चौकशी दरम्यान या गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून सांगली पोलिसांनी खामगाव येथे येऊन पिस्तूल विक्रीचा संशय असलेल्या जॉनी ऊर्फ रविकुमार राजेंद्र शमी (वय २९) रा. धोबी खदान याला अटक केली.