सैलानी दर्ग्यातील दर्शनही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:08 IST2020-03-18T12:08:41+5:302020-03-18T12:08:46+5:30
सैलानी बाबा दर्ग्यातील दर्शन सुविधा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे.

सैलानी दर्ग्यातील दर्शनही बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/पिंपळगाव सराई: जिल्ह्यातील सर्व यात्रा महोत्सव तथा सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असतानाच आता चिखली तालुक्यातील सैलानी येथील सैलानी बाबा दर्ग्यातील दर्शन सुविधाही कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी १७ मार्च रोजी आदेश निर्गमीत केला आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सैलानी दर्गा येथील दर्शन सुविधाही बंद करण्यात आली आहे.
सोबतच या परिसरात असलेल्या फुल विक्री दुकानांनाही अनुषंगीक आदेश लागू राहणार असल्याचे या संदर्भातील निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.
१७ मार्चला सायंकाळी सैलानी दर्गा दर्शनासाठी बंद करण्यात आला होता.