शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

राम मंदीरासाठी २३ वर्षे चप्पलचा त्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 11:23 AM

१९८६ पासुन श्रीराम मंदीर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत २३ वर्षे पाळली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेंबा : अयोध्येत रामजन्मभुमीवर प्रभु रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणुन अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला, अनेकांनी बलीदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकूंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासुन श्रीराम मंदीर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत २३ वर्षे पाळली.नांदूरा तालुक्यातील तांदुळवाडी सिध्देश्वर येथील रहिवासी संत आदिशक्ती मुक्ताईचे निष्काम सेवाव्रती, वैकूंठवासी नारायण महाराज जुनारे अयोध्या आंदोलनात १९८६ पासुन सहभागी झाले होते. तेव्हापासून २३ वर्षे २००८ पर्यंत पायात बुट चप्पल, पादत्राणे त्यांनी उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात कधीच घातली नाही. तत्कालीन तालाखोलो आंदोलन व शिलापूजन, कारसेवा आदि प्रत्येक लढ्यात ते हिरिरीने सहभागी झाले.त्यांनी राम मंदिराचा लढा घराघरात पोहचवला. विश्र्व हिंन्दु परिषद मोताळा प्रखंड प्रमुख, खामगाव जिल्हा संत समिती प्रमुख, विहिंप विदर्भ प्रांताचे आजीवन सदस्य या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतात राम मंदिर लढ्यातील एक निस्पृह तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख होती. श्रीरामपंत जोशी, राजेश जोशी, बापूसाहेब करंदीकर हे महाराजांच्या निस्पृह कार्याचा गौरव अनेक वेळा करीत होते. सहकारी भानुदास गोंड गुरुजी, विजू कुलकर्णी, नारायणदादा कोलते व अन्य कारसेवकासह अयोध्येत ते सुध्दा अग्रेसर होते. कारसेवेनंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी महाराज रावेर येथील वारकरी गोंडू बुवा यांच्याकडे तीन महिने राहिले.आयुष्यभर आपल्या कीर्तन- प्रवचनात राममंदिर आंदोलन जनजागृती हा विषय ते लावून धरत होते. ते राम जन्मभूमीचे विचार बेधडकपणे मांडायचे. नारायण महाराज यांची मुक्ताईवर अपार निष्ठा होती.आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प.पू.मोठेबाबा नेहमी कामानिमित्त विदर्भ कींवा खानदेशात आले तर आवर्जून विचारायचे नारायण बूवा यांनी बुट घातला की नाही, त्यांना बुट घालायला हावा, असे सांगायचे. परंतु गुरूंची सुध्दा माफी मागत शेवटपर्यंत त्यांनी प्रतिज्ञा मोडली नाही. प.पू. भास्करगिरी महाराज देवगड यांनी महाराजांचे पायांना जास्त त्रास होतांना पाहीले व लाकडी खडावा पाठवून दिल्या होत्या. आईसाहेब मुक्ताई फडावरील स्व.नारायण महाराज जुनारे रामजन्मभुमी आंदोलनातील एक पणती होते. आज अयोध्येत राममंदिर भुमीपूजन संपन्न होत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा