शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी नियमांचा गळफास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:01 IST

बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या  आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या  आहेत.  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्याभोवती मदतीसाठी नियम व अटींचा गळफास घातल्याने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १८६ कुटुंब मदतीविना आहेत.पीक-पाणी बदलले की, शेतकºयांच्या अर्थचक्रात बदल होतो. जिल्ह्यातील शेतकºयांसमोर वारंवार अडचणींचा डोंगर कायम राहत आहे. शेतकºयांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर मात करून शेतकºयांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे; परंतू या संघर्षापुढेही हात टेकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळतात. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आणि आत्महत्येचा हा प्रवास सुरूच आहे. प्रशासन केवळ पंचनामा करून शासनदप्तरी नोंद घेण्यातच धन्यता मानतात. शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची मदत देण्यात येते. मात्र, यामध्येही नियम व अटींमुळे ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत ३४१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्यांपैकी १८६ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. सात हजार १०५ प्रकरण मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, त्यापैकी १२७ प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात मदत देण्यात आली. तर २८ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विविध अटींच्या नावावर आत्महत्याग्रस्त शेतकºयांचे कुटुंब शासकीय मदतीपासून वंचीत राहत असल्याची गंभीर स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

२८ प्रकरणे प्रलंबीतजानेवारी २०१८ पासून आजपर्यंत १२७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना मदत देण्यात आली आहे. तर २८ शेतकरी आत्महत्या सरकारी मदतीसाठी चौकशीवर प्रलंबीत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

अपात्र प्रकरणांची कारणेआत्महत्येच्या प्राथमिक चौकशीत दिलेल्या कारणांवरून शेतकरी आत्महत्या सरकारी मदतीस पात्र आहे की नाही, ते ठरविण्यात येते. शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्यानंतरच कुटुंबाला आर्थिक मदत दिल्या जाते. मात्र जिल्ह्यातील १८६ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून त्यामध्ये अपात्र प्रकरणांची कारणेही वेगवेगळी दाखविण्यात आली आहेत. त्यात घरघुती भांडण, व्यसनाधिनता व इतर कारणे पुढे करण्यात आली आहेत. 

शासन दरबारी नापिकी नव्हे, कर्जबाजारीपणा  दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवर किडींचे आक्रमण यासारख्या अनेक कारणांमुळे सततची नापिकी होत असते. त्यात वाढलेला उत्पादन खर्च, शेतमालाला अत्यल्प भाव यामुळेही शेतकरी आत्महत्यांचा मार्ग निवडतात. परंतू जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्या नापिकीने नव्हे, तर कर्जबाजारीपणामुळे झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडे नमुद आहे.  जानेवारी २०१८ ते आजपर्यंतचे चित्रशेतकरी आत्महत्या          ३४१मदतीसाठी पात्र          १२७मदतीसाठी अपात्र         १८६चौकशीसाठी प्रलंबीत     २८

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या