‘एसआयटी’ करणार रूईखेड मायंबा प्रकरणाचा तपास!
By Admin | Updated: June 9, 2017 00:01 IST2017-06-09T00:01:01+5:302017-06-09T00:01:01+5:30
पोलीस अधीक्षकांनी घेतली पीडितेच्या कुटुंबीयांची भेट.

‘एसआयटी’ करणार रूईखेड मायंबा प्रकरणाचा तपास!
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : रुईखेड मायंबा येथे एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्या प्रकरणाचा तपास करण्याकरिता विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले असून, आता सदर पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे.
विविध संघटनांनी या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांनी पीडित राधाबाई उंबरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या ठिकाणी त्यांनी घटनेसंदर्भात माहिती घेऊन गावातून पीडित महिलेच्या कुटुंबास त्रास होण्याची शक्यता पाहता पोलीस अधीक्षकांनी एक विशेष पथकाची स्थापना करून या पथकाचे प्रमुख बी.बी.महामुनी डीवायएसपी यांच्यासह ठाणेदार संग्राम पाटील, महिला पोलीस अधिकारी पीएसआय मनिषा हिवराळे, महिला पोलीस हवालदार मंगला गायकवाड, महिला पोकॉं रेखा म्हात्रे यांचा पथकात समावेश आहे.
या घटनेचा अधिक तपास विशेष पथकाचे माध्यमातून होत असून, या घटनेत आरोपींची संख्या वाढणार असल्याची शक्यता आहे. गावात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.