शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

रब्बी हंगामात तूट भरून काढण्याची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:26 IST

लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे.

ठळक मुद्दे४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी १ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन 

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आतापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली  असून, त्यांच्यासमोर खरीप हंगामातील तूट भरून काढण्याचे आव्हान आहे.  त्यानुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले असून, १ लाख ३६ हजार मेट्रिक टन ख तही रब्बीसाठी उपलब्ध आहे.जिल्ह्यात रब्बीचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.  त्यापैकी ४१  टक्केपेक्षा जास्त म्हणजे ५५ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी  झाली. यासाठी १ लाख  ३६ हजार ५00 टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यात रब्बी  हंगामात  ज्वारी, मका, गहू ही पिके घेतली जातात. परतीच्या पावसामुळे शे तकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, रब्बीच्या पेर्‍यात वाढ होण्याची शक्यता  आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी त्याने मोठी ओढ  दिलेली होती. परतीच्या पावसाने जमिनीत ओल व विहिरीत समाधानकारक पाणी  आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या रब्बीची अपेक्षा आहे. सध्या पेरणी सुरू असून, सरत्या  आठवड्यापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त पेरणी झाली. सर्वांत जास्त पेरणी चिखली  तालुक्यात १७ हजार ३७४ हेक्टरवर करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यात  १0 हजार ९९५, जळगाव जामोद तालुक्यात ५00, संग्रामपूर २ हजार ५२५,  देऊळगाव राजा ३ हजार ९00, मेहकर २ हजार ६९४, सिंदखेड राजा ४ हजार  ८७४, लोणार ७ हजार ३२४, खामगाव ३ हजार ६0५, शेगाव ३४0, मलकापूर  ५७0, मोताळा १0६ व नांदूरा तालुक्यात २७0 हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात  आली आहे. रब्बी हंगामातील उत्पादन जास्तीत जास्त वाढण्यासाठी शेतकरी प्रय त्नशील  असल्याचे दिसून येत आहे. 

रब्बी हंगामासाठी पुरेशी रासायनिक खते उपलब्धयावर्षी रब्बीच्या पेर्‍याच्या अंदाजानुसार बियाणे व खतांच्या मागणीचा अहवाल  शासनाला एक महिन्यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. त्यादृष्टीने ८0 हजार २६  मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. तर शासनाकडून  एकूण १ लाख ३६ हजार ५00 मेट्रिक टन खताची उपलब्धता करून देण्यात आली  आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाची तूट असल्यामुळे खताचा साठा शिल्लक हो ता. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात मागणीपेक्षा जास्त म्हणजे एकूण १ लाख ३६  हजार ५00 मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध आहेत. त्यात युरिया ३१ हजार  मेट्रिक टन, डीएपी १८ हजार ७00 मेट्रिक टन, एमओपी ६ हजार मेट्रिक टन व इ तर खतांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेती