रेती माफियांना ३६ लाख रुपये दंड

By Admin | Updated: July 3, 2014 23:00 IST2014-07-03T21:11:06+5:302014-07-03T23:00:36+5:30

चार रेती माफीया विरुद्ध तहसिलदार यांनी सुमारे ३६ लाख रुपये दंड आदेश दिले आहेत.

Rs 36 lakh fine for sand mafia | रेती माफियांना ३६ लाख रुपये दंड

रेती माफियांना ३६ लाख रुपये दंड

मेहकर : रेतीचा मोठय़ा प्रमाणावर साठा करुन कोणत्याही प्रकारची परवानगी नसलेल्या चार रेती माफीया विरुद्ध तहसिलदार निर्भय जैन यांनी सुमारे ३६ लाख रुपये दंड करुन एक महिन्याच्या आत दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणात विना परवाना रेती साठा होत असल्याच्या तक्रारी आल्याने १४ ऑक्टोबर २0१३ रोजी शेख हारुण शेख गुलाब १७५ ब्रॉस, अलियार खान करिम खान ३३0 ब्रास, तनशिराम शिवाजी मानघाले ३३५ ब्रास, युनूसखान करिम खान ८९ ब्रास व सिद्धीक खान हारुन खान ७३६ ब्रास असा एकुण १ हजार ६६५ ब्रास अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. सदर अवैध रेतीचा अहवाल सार्वजनीक बांधकाम उपविभाग मेहकर यांनी मोजमाप करुन सादर केला.
त्यात रेती माफीया जवळ रेतीसाठय़ाचा बहुतेक पावत्यावर रेती विकलेल्या व्यक्तीचे सदरी गैर अर्जदार यांचे नावांचा उल्लेख नाही. सदर गैर अर्जदाराकडे रेतीचा साठा करण्याबाबत कोणतीही परवानगी घेतल्याचे आढळले नाही. ज्या जागेवर रेतीसाठा केला आहे, त्या जागेचा बिनशेती परवानगी बाबत तसेच जागा बांधकामाबाबत कोणताही दस्ताऐवज गैरअर्जदार सादर करु शकले नाही. त्यामुळे तहसिलदार निर्भय जैन यांनी सदर प्रकरणात महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७)(८) व शासन निर्णय १२ मार्च २0१३ नुसार अवैध रेती साठय़ाबाबत अलीयार खान करीम खान यांना १३ लाख ७६ हजार रुपये, तनशिराम शिवाजी मानघाले रा. खंडाळा यांना ४ लाख ८ हजार रुपये, सिद्धीक खान हारुण खान रा. मेहकर यांना ६ लाख १४ हजार ४00 रुपये, शेख हारुण शेख गुलाब यांना ११ लाख ९0 हजार ४00 रुपये असा एकुण ३५ लाख ८८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. एक महिन्याच्या आत दंड न भरल्यास गैर अर्जदाराचे मालमत्तेचा तपशिल सादर करण्याचे तलाठी मेहकर यांना आदेश दिले आहेत.
रेती माफीया धारकांना मोठय़ाप्रमाणात दंड करण्याची ही पहिलीच वेळ असून, किती प्रमाणात हे लोक दंड भरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rs 36 lakh fine for sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.