शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

जलसंवर्धनाच्या ‘बुलडाणा पॅटर्न’मुळे १०० कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 4:59 PM

Buldhana, National Highway राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती ते मुक्ताईनगर दरम्यान होणाऱ्या कामातही हा पॅटर्न वापरण्यात येणार आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जलसंवर्धनाच्या बुलडाणा पॅटर्नमुळे  १०० कोटी रुपयांची राज्य शासनाची बचत झाली असून जिल्ह्यातील ६७ तलाव व नदी नाल्यांचे खोलीकरण झाले आहे. दरम्यान, आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती ते मुक्ताईनगर दरम्यान होणाऱ्या कामातही हा पॅटर्न वापरण्यात येणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे करताना लागणारा मुरूम व माती ही जिल्ह्यातील ६७ तलाव व नदी, नाल्यांचे खोलीकरण करून काढण्यात आला आहे. जवळपास ६५ लाख घनमीटर एवढा मुरूम व माती राष्ट्रीय महामार्गाच्या जिल्ह्यातील कामात यातून वापरण्यात आली आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यात ६,५५९ टीसीएम पाण्याचा साठा झाला. तसचे दोन वर्षे पडलेला चांगला पाऊस तलावांचे झालेले खोलीकरण यामुळे गेल्या वर्षी जिल्ह्याची भूजल पातळी ही  ३.७६ मिटरने वाढण्यास मदत झाली. बुलडाणा जिल्ह्यात २०१६ पासून प्रामुख्याने रस्त्यांच्या कामात नदी, नाल्यांचे तथा तलावांचे खोलीकरण करून त्यातील मुरूम व माती वापरण्यात येत आहे. त्यामुळे गौणखनीजापोटी द्यावे लागणारे शुल्कही वाचण्यास मदत झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, या पॅटर्नवर आता निती आयोग राष्ट्रीयस्तरावरील धोरण ठरवत आहे.

एनएच ६ मध्येही होणार वापरअमरावती ते मुक्ताईनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कामामध्येही बुलडाणा पॅटर्नचा वापर होणार आहे. बाळापूर ते मलकापूर नजीकच्या चिखली पर्यंतच्या पट्ट्यास त्यात प्राधान्य देण्यात आले आहे. यातही नदी, नाल्यांचे खोलीकरण करून त्यातून निघणारा मुरूम हा या रस्त्याच्या कामात वापरण्यात येणार आहे. महामार्गाची रुंदी अधिक असल्याने मुरूम अधीक लागेल.

 बारा रस्त्यांसाठी वापरला मुरूमबुलडाणा पॅटर्नअंर्गत १३६ ठिकाणाहून हा मुरूम काढण्यात आला असून तो १२ रस्त्यांच्या कामामध्ये वापरण्यात आला. यामध्ये अंजिठा-बुलडाणा, खामगाव-चिखली, चिखली-ते बेराळा, बेराळा ते जालना, खामगाव-मेहकर, खामगाव-शेगाव, नांदुरा-जळगाव जामोद यासह अन्य रस्त्यांच्या कामात हा मुरूम वापरण्यात आला आहे. बुलडाणा पॅटर्न व वर्धा-नागपूर परिसरातील तामसवाडा पॅनर्ट आगामी कालात जलसंर्धनाच्या कामासाठी उपयुक्त असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6