दाताळ्यात जनक जिनींगमध्ये दरोडा; २१ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:05 IST2019-04-04T15:05:24+5:302019-04-04T15:05:42+5:30
मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

दाताळ्यात जनक जिनींगमध्ये दरोडा; २१ लाख लंपास
मलकापूरः तालुक्यातील मौजे दाताळ्याती जिनींगमध्ये २१ लाखांची जबरी चोरी झाल्याची घटना काल बुधवारी रात्री घडली. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विवीध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील मौजे दाताळा येथील जनक जिनींगमध्ये बुधवारी रात्री अज्ञात इसमांनी हल्ला केला. व्यवस्थापक भुषण चांडक यांच्या अपरोक्ष मुख्य काऊंटरवरून २१ लाख ४० हजार ४६० रूपये लंपास केले. हा प्रकार भुषण चांडक यांनी मालकाच्या कानावर घातला. त्यामुळे जनख जिनींगचे संचालक भरत विनोदकुमार मुंदडा यांनी पोलिसात तक्रार दिली.
त्या अनुषंगाने मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अद्यात आरोपीविरुद्ध अपराध नं.४५/१९कलम ४६२,३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सपोनि प्रमोद सोनवणे करित आहेत.