बचत गटाचे पैसे घेऊन जाणाऱ्या दोघांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:12 IST2019-11-27T15:12:04+5:302019-11-27T15:12:11+5:30
दोघांकडील जवळपास ७५ हजार रुपये अज्ञातांनी लुटल्याचे समोर आले आहे.

बचत गटाचे पैसे घेऊन जाणाऱ्या दोघांना लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बचत गटांचे गोळा केलेले पैसे दुचाकीवर घेऊन जाणाºया दोघांना कारमधून आलेल्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना अंजनी-लोणीगवळी मार्गावर २६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यातील नळणी येथील विकास नामदेव देठे हे क्रेडीट अॅक्सीस ग्रामिण लिमिटेडचे कर्मचारी बचत गटाचे जमा केलेले पैसे घेऊन मेहकरकडे दुचाकीवर (एमएच-२१-बीएम-६७१२) जात असताना आंध्रृड शिवारात विना क्रमांकाच्या एका कारमध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिल्याने ते खाली पडले. लगोलग कारमधून काही जण उतरले व त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील बचत गटाचे जमा झालेले पैसे लुटले. दरम्यान, जालना जिल्ह्यातीलच भोकरदन तालुक्यातील आशिष भाऊसाहेब दांडगे हे हे ही बचत गटाचे पैसे घेऊन लोणीगवळी वरून दुचाकीवर (क्रमांक एमएच-२१-बीके-९८१३) द्वारे मेहकर कडे जात असताना त्यांच्या दुचाकीलाही उपरोक्त कारने धडक देऊन त्यांना खाली पाडले व त्यांच्याकडील बडत गटाचे घेऊन पलायन केले. यामध्ये दोघांकडील जवळपास ७५ हजार रुपये अज्ञातांनी लुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर डोणगाव ठाणेदारांनी दोन पथके नियुक्त करून चोरट्यांचा शोध सुरू केला असून अद्याप ते सापडले नाहीत.