सावत्रा येथे लोकवर्गणीतून बांधले रस्ते
By Admin | Updated: June 30, 2014 02:10 IST2014-06-29T23:51:00+5:302014-06-30T02:10:40+5:30
मेहकर तालुक्यातील सावत्रा येथील शेतकर्यांनी लोकवर्गणीतून रस्ते बांधले.

सावत्रा येथे लोकवर्गणीतून बांधले रस्ते
मेहकर : तालुक्यातील सावत्रा येथील शेतकर्यांनी लोकवर्गणीतून ९ कि.मी. लांबीचे चार रस्ते तयार केले आहे त. यासाठी शेतकर्यांची तब्बल ३ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली. शेतकर्यांनी राबविलेला हा उपक्रम इतर ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सावत्रा येथील शेतरस्त्याची अत्यत दुरावस्था झाली होती. याबाबत बर्याच वेळा प्रशानाकडे मागणी ही करण्यात आली. मात्र फायदा झाला नाही. यामुळे शेतकर्यांनी शेतरस्ता व पांदनरस्ता तयार करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता. त्यानुसार एकरी २00 रुपये लोकवर्गणी जमा करण्याचे ठरले.
त्यामध्ये ग्रामस्थांनी तब्बल ३ लाख रुपये लोकवर्गणी जमा केली. या लोकवर्गणीतून सावत्रा ते सोनार गव्हाण ३ कीमीचा शीवरस्ता, सावत्रा ते जानेफळ २ कीमीचा पांदन रस्ता, सोनार गव्हाण ते जानेफळ २ कीमी पांदन रस्ता, सोनार गव्हाण ते मुंदेफळ २ कीमी पांदन रस्ता हे रस्ते तयार करण्यात आले. लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांचे लोकार्पण २८ जून रोजी आ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.