शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

बुलडाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांच्या प्रस्तावाबाबत मुंबई येथे २८ जानेवारी रोजी बैठक पार ...

बुलडाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांच्या प्रस्तावाबाबत मुंबई येथे २८ जानेवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीत सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याविषयी चर्चा करण्यात आली. ही बैठक पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याबराेबर घेतली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले, आशियाई विकास बँकेच्या निधीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील दोन रस्त्यांचा समावेश प्राधान्याने करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच या मतदारसंघातील प्रस्तावित २८ कोटी रकमेची रस्ते व पुलांची कामे केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत.

हे प्रस्ताव प्राधान्याने विचारात घेऊ तसेच येत्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त रस्त्यांच्या कामांना निधी देण्याच्या पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मागणीलाही चव्हाण यांनी सहमती दर्शविली. सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते, पूल व इमारतींचा समावेश केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, विशेष दुरुस्ती कार्यक्रम या विविध योजनेमध्ये करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी केली. यामध्ये आशियाई विकास बँक अंतर्गत पाच कोटी ४३ लाख रकमेची चार रस्त्यांची सुधारणा, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत २८ कोटी ७० लाख किमतीची सुमारे १४ कामे तसेच नाबार्ड अंतर्गत १३ कोटी ३८ लाख रकमेच्या १० कामांचा समावेश आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पात राज्यमार्गाची चार कामे, प्रमुख जिल्हा मार्गाची १२ कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे शिंगणे यांनी यावेळी सांगितले.

रस्त्याच्या कामांना प्राधान्य देणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले की, आशियाई विकास बँक निधीअंतर्गत प्रस्तावित अमडापूर-लव्हाणा-दुसरबीड-राहेर- वर्दळी ते जालना जिल्हा सीमा रस्ता आणि शेंदुर्जन-राजेगाव-सुलतानपूर-वेणी-गुंधा-हिरडव-वढव ते वाशिम जिल्हा हद्द या दोन्ही रस्त्यांचा समावेश करण्यासंदर्भात प्राधान्याने विचार केला जाईल. तसेच केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत या मतदारसंघातील जास्तीत जास्त कामे घेण्यात येईल.

विश्राम गृह नूतनीकरणाचे प्रस्ताव पाठवा

सिंदखेड राजा येथील पर्यटन विभागाकडे असलेले विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर त्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात येईल. तसेच देऊळगाव मही येथील विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचाही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश चव्हाण यांनी यावेळी दिले.