रस्ता अडवून मारहाण; गुन्हा दाखल

By Admin | Updated: February 7, 2017 02:54 IST2017-02-07T02:54:05+5:302017-02-07T02:54:05+5:30

शेगाव तालुक्यातील कनारखेड येथील घटना.

Road blocking; Filed the complaint | रस्ता अडवून मारहाण; गुन्हा दाखल

रस्ता अडवून मारहाण; गुन्हा दाखल

शेगाव, दि. ६- शेतात मशागत करीत असताना अडवणूक करुन एकास मारहाण केल्याची घटना सोमवारी कनारखेड येथे घडली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शेगाव तालुक्यातील ग्राम कनारखेड येथील मारोती तुळशीराम निळे (वय ३४) हे सोमवारी न्यायालयाच्या आदेशावरून आपल्या शेतीची मशागत करीत असताना त्यांना फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी रामेश्‍वर रामभाऊ निळे, रंजना रामेश्‍वर निळे, ज्योती रामेश्‍वर निळे सर्व रा.कनारखेड यांनी टॅक्टर अडवून त्यांना मारहाण करुन शिवग्ीाळ केली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३४१, ५0४, ५0६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉं गजानन सातव हे करीत आहेत.

Web Title: Road blocking; Filed the complaint