श्रीमंतांकडूनही गॅस अनुदान सुटेना!

By Admin | Updated: August 6, 2016 02:15 IST2016-08-06T02:15:35+5:302016-08-06T02:15:35+5:30

केवळ पाच टक्केच ग्राहकांचा अनुदानास नकार : बुलडाणा जिल्ह्यात तीन लाखांवर सिलिंडरधारक .

Rich donuts gas subsidy! | श्रीमंतांकडूनही गॅस अनुदान सुटेना!

श्रीमंतांकडूनही गॅस अनुदान सुटेना!

ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. ५ : जिल्ह्यात सुमारे ३ लाख ११ हजार ३९१ गॅस सिलिंडर ग्राहक आहेत; मात्र यातील केवळ १७ हजार १४६ म्हणजे ५.५0 टक्केच गॅसधारकांनी गॅस अनुदान घेण्यास नकार दिला आहे. आर्थिक क्षमता चांगली असणार्‍यांनी गॅस अनुदानाचा गोरगरिबांसाठी स्वत:हून त्याग करावा, असे आवाहन शासनाकडून वारंवार करण्यात आले आहे. तरीसुद्धा जिल्ह्यातील श्रीमंत असलेल्या गॅसधारकांकडूनही अनुदान सुटत नसल्याचे दिसून येत आहे.
घरगुती वापराच्या गॅससिलिंडरपोटी शासनाकडून अनुदान देण्यात येते. त्यामध्ये आर्थिक क्षमता चांगली असणार्‍या गॅसधारकांनी गॅस अनुदानाचा स्वत: हून त्याग करावा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. या अनुदानाचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्यात येतो. त्यासाठी सर्व गॅस कंपन्यांनी मिळून गॅस अनुदान परत करण्यासाठी ह्यगिव्ह इट अपह्ण ही मोहीम हाती घेऊन गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा स्वत:हून त्याग करावा, असे आवाहन केले; मात्र या मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद दिसून आला नाही. जिल्ह्यात गॅसधारकांची एकूण संख्या लक्षात घेता, अनुदान नाकारणार्‍या ग्राहकांची संख्या खूपच कमी आहे. जिल्ह्यात सुमारे ३ लाख ११ हजार ३९१ गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. यातील केवळ १७ हजार १४६ म्हणजे ५.५0 टक्केच गॅसधारकांनी गॅस अनुदान घेण्यास नकार दिला आहे. शासनाने सुरुवातीला गॅस अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक करण्याचे बंधनकारक केले. यामध्ये शंभर टक्के लोकांनी आधार लिंक करावे म्हणून आधार लिंक न करणार्‍या ग्राहकांना गॅस सिलिंडर न देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ३९१ गॅस सिलिंडर ग्राहकांपैकी २ लाख ११ हजार ६0 ग्राहकांनी गॅस सिलिंडर आधार लिंक केले आहे. त्यामुळे आधार लिंक केलेल्या सर्व ग्राहकांच्या बँक खात्यात सध्या गॅस अनुदान जमा होते. त्यामुळे आधार लिंक झाले व गॅस सिलिंडरचे अनुदान नाकारायचे आहे, त्यांना आता संबंधित गॅस एजन्सीकडे स्वतंत्र अर्ज भरून द्यावा लागणार आहे. हा अर्ज भरून दिल्यानंतर संबंधित ग्राहकांना आपण नाकारलेले गॅस अनुदानाचा कोणाला लाभ झाला, हे त्यांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येते. गॅसधारकांच्या संख्येच्या तुलनेत गॅस अनुदान सोडणार्‍या गॅसधारकांची संख्या अत्यंत कमी असल्याने जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.

बचत केवळ ३४ लाख रुपयांची
गॅस सिलिंडरच्या दरानुसार सरासरी १८0 ते २00 रुपयांचे अनुदान गॅस सिलिंडर ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते. जिल्ह्यात गॅस अनुदान नाकारलेल्या ग्राहकांची संख्या १७ हजार १४६ आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात गॅस अनुदान नाकारल्यामुळे सरासरी ३४ लाख २९ हजार २00 रुपयांची दर महिन्याला बचत होत आहे; परंतु जिल्ह्यातील श्रीमंत लोकांची संख्या लक्षात घेता, यामध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Rich donuts gas subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.