नेहरू युवा केंद्रामार्फत क्रांतिदिनी स्वच्छता रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:17 IST2017-08-10T00:16:47+5:302017-08-10T00:17:17+5:30

चिखली : नेहरू युवा केंद्र बुलडाणाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत ९ ऑगस्टला शहरातून स्वच्छतेविषयक जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

Revolutionary Cleanliness Rally by Nehru Yuva Kendra | नेहरू युवा केंद्रामार्फत क्रांतिदिनी स्वच्छता रॅली

नेहरू युवा केंद्रामार्फत क्रांतिदिनी स्वच्छता रॅली

ठळक मुद्देशहरातून काढण्यात आली स्वच्छतेविषयक जनजागृतीपर रॅलीमहिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : नेहरू युवा केंद्र बुलडाणाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत ९ ऑगस्टला शहरातून स्वच्छतेविषयक जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
स्थानिक o्री शिवाजी विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयातून ही रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. रॅलीला मंडळ अधिकारी अरविंद शेळके यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे, शिवराज पाटील, संतोष काळे, नितेश थिगळे, वैशाली थिगळे, नितीन भारती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी. भुसारी, डॉ. दत्त देशमुख, अजयसिंग राजपूत उपस्थित होते. प्रास्ताविक नितेश थिगळे, तर संचालन सुरडकर यांनी केले. यशस्वितेसाठी कैलास येवले, गणेश चव्हाण यांनी परिo्रम घेतले. 
 
Web Title: Revolutionary Cleanliness Rally by Nehru Yuva Kendra