retired headmistress Suspiciously died in buldhana | सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू
सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू

खामगाव : नॅशनल हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी उघडकीस आली. शैला प्रल्हाद नांदे (वय ७०) या खामगाव येथील जलालपुरा भागात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला.

शैला नांदे दररोज काही वेळ घराबाहेर बसायच्या. मात्र दोन तीन दिवसापासून त्या दिसल्या नाही म्हणून शेजारच्यांनी घरात डोकावून पाहिले. तेव्हा त्यांना शैला नांदे दिसून आल्या नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. तेव्हा त्यांनी घर उघडून पाहिले असता नांदे यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणून पाठवला. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. 


Web Title: retired headmistress Suspiciously died in buldhana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.