निमगाव गुरू येथील आठवीचा वर्ग पुन्हा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:53+5:302021-09-25T04:37:53+5:30

निमगाव गुरू येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेमध्ये एकूण १४७ विद्यार्थी असून, या शाळेतील इयत्ता आठवीमध्ये एकूण १७ विद्यार्थी ...

Resume the eighth class at Nimgaon Guru | निमगाव गुरू येथील आठवीचा वर्ग पुन्हा सुरू करा

निमगाव गुरू येथील आठवीचा वर्ग पुन्हा सुरू करा

निमगाव गुरू येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेमध्ये एकूण १४७ विद्यार्थी असून, या शाळेतील इयत्ता आठवीमध्ये एकूण १७ विद्यार्थी आहेत. यामध्ये अकरा मुली आणि सहा मुले आहेत. ग्रामीण भागामध्ये मुली बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवीत नाही. या शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त असताना जिल्हा परिषद शालेय विभागाने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता निमगाव गुरू येथील जि. प. उच्च माध्यमिक शाळेचा ८वीचा वर्ग बंद केला आहे. हा वर्ग बंद केल्यामुळे गावातील मुली शिक्षणापासून वंचित राहतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने बंद केलेला आठवीचा वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी चित्ते यांनी निवेदनात केली आहे.

तालुक्यातील निमगाव गुरू, टाकरखेड भागिले, देऊळगाव मही उर्दू शाळा या तीन शाळांची तक्रार असताना कोणतीही चौकशी न करता फक्त निमगाव गुरू येथील आठवीचा वर्ग बंद का करण्यात आला? हा वर्ग त्वरित चालू करण्यात यावा.

एकनाथ चित्ते, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

Web Title: Resume the eighth class at Nimgaon Guru