अवमान प्रकरणाचे बुलडाण्यात पडसाद
By Admin | Updated: June 2, 2014 00:35 IST2014-06-02T00:20:12+5:302014-06-02T00:35:17+5:30
अवमान प्रकरणाचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा उमटले; ठिकठिकाणी रस्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.

अवमान प्रकरणाचे बुलडाण्यात पडसाद
बुलडाणा : फेसबुक या सोशल साईटवर महापुरुषांचे आक्षेपार्ह फोटो अपलोड करून धार्मिक भावना दुखविण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी केलेले कृत्य शनिवारी उघडकीस आल्यानंतर राज्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा उमटुन ठिकठिकाणी रस्ता रोको, बंद व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. दोषीवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांना स्थानबध्दही केले. देऊळगावराजा शहरात या घटनेचे तिव्र पडसाद उमटून सर्वच स्थरातून निषेध व्यक्त होत आहे. रविवारी शिवसेना, भाजप, मनसे व शिवछत्रपती मित्रमंडळाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. तर आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करुन आरोपीचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शेगाव शहरात रस्ता रोको करून घटनेचा निषेध करण्यात आला. त्याच प्रमाणे संग्रामपूर, जळगाव जामोद, खामगावासह जिल्ह्यात घटनेचा तिव्र निषेध करण्यात आला.